जळगाव विमानतळाचे होणार खासगीकरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:30+5:302021-09-14T04:19:30+5:30

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या काही वर्षांत देशातील वाढलेली विमानतळांची संख्या आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता देशातील ...

Jalgaon airport to be privatized? | जळगाव विमानतळाचे होणार खासगीकरण?

जळगाव विमानतळाचे होणार खासगीकरण?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या काही वर्षांत देशातील वाढलेली विमानतळांची संख्या आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता देशातील काही विमानतळे पीपीपी तत्त्वाच्या माध्यमातून थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नुकतेच देशातील लहान- मोठी मिळून १३ विमानतळे खासगीकरणामध्ये समावेश करण्यात आली आहेत. त्यात मोठ्या विमानतळंमध्ये भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, त्रिची, इंदूर, रायपूर यांचा समावेश असून, सात लहान विमानतळांमध्ये झारसुगुडा, गया, कुशीनगर, कांगडा, तिरूपती, जबलपूर आणि शेवटी जळगाव विमानतळाचेही नाव आहे.

मात्र, जळगाव विमानतळाचे खासगीकरण होण्याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून कुठलेही आदेश किंवा पत्र प्राप्त झालेले नाही तसेच केंद्राच्या कुठल्याही निर्णयात खासगीकरण झालेले नाही तसेच सोशल मीडियावर फिरणारा मेसेज हा ‘खोटा’ असल्याचे सुनील मुगरीवार यांनी सांगितले तसेच कुणीही या मॅसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही मुगरीवार यांनी केले आहे.

Web Title: Jalgaon airport to be privatized?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.