शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: पोलिसांत तक्रार केल्याने तरुणीला दिली बलात्काराची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ajay.patil | Updated: July 18, 2023 14:31 IST

Jalgaon: जळगाव शहरातील विविध भागांमध्ये विवाहिता व एका तरुणीचा विनयभंग केल्याचा दोन घटना घडल्या असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- अजय पाटील

जळगाव - शहरातील विविध भागांमध्ये विवाहिता व एका तरुणीचा विनयभंग केल्याचा दोन घटना घडल्या असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणात शहरातील एका भागात पोलिसात तक्रार केल्याचे वाईट वाटल्याने एकाने तरुणीच्या घरात घुसून तिला अश्लिल शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली. पोलीसात तक्रार केली, म्हणून थेट तरुणीला बलात्कार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून कल्पेश उर्फ बाळा शिंपी (वय.२९) याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीवरून शिंपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश शेंडे हे करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत जुने जळगाव भागात राहणाऱ्या एका विवाहितेचा पाठलाग करून, विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात  सचिन मिस्तरी (वय ३४ व संतोष गवळी (वय ३२) (दोन्ही रा.कांचन नगर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव