जळगाव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पाटणादेवी येथे शाळेचे पत्रे उडले

By चुडामण.बोरसे | Updated: April 20, 2023 17:54 IST2023-04-20T17:54:32+5:302023-04-20T17:54:48+5:30

पाटणादेवी ता. चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे वादळामुळे उडाले. 

Jalgaon : | जळगाव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पाटणादेवी येथे शाळेचे पत्रे उडले

जळगाव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पाटणादेवी येथे शाळेचे पत्रे उडले

जळगाव :  जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव आणि भडगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पाटणादेवी ता. चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे वादळामुळे उडाले. 

पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिंदी ता. भडगाव येथे  दुपारी ४ वाजता अचानक  वादळ, वारा व पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी वीज पडून एक बैल ठार झाला. शेतातील चारा जळून खाक झाला. 
वरखेडी ता. पाचोरा येथे गुरुवारी आठवडी बाजार होता. अचानक सुरु वादळामुळे बाजारात एकच धांदल उडाली.

Web Title: Jalgaon :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.