शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : चाकूचा धाक दाखवून सराफाकडील ३७ लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 22:04 IST

नरवेल रस्त्यावर सायंकाळचा थरार. झटापटीत व्यापारी जखमी.   

मुनाफ शेख 

सराफाला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी  ३७ लाख रुपयांचे सोने- चांदीचे दागिने, रोख ८० हजार रुपये लूटून नेले. ही थरारक घटना नरवेल ता. मुक्ताईनगर रस्त्यावर बुधवारी  सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या झटापटीत सराफ जखमी झाला आहे. 

नरवेल येथील निलेश वसंत सोनार यांचे उचंदा येथे धनाई ज्वेलर्स हे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी दुकान बंद करून ते नरवेल येथे दुचाकीने परत जात होते. त्याचवेळी नरवेलनजीक लक्ष्मण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात दरोडेखोरांनी मागून येऊन त्यांना दुचाकी आडवी लावली आणि चाकूचा धाक दाखविला. दरोडेखोरांनी दुचाकीची डिक्की दगडाने तोडून ३७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये ७०० ग्रॅम सोने, तीन किलो चांदी व ८० हजार रुपये रोख रक्कम लूटून नेले. यानंतर काही क्षणातच दरोडेखोर पसार झाले. यावेळी झालेल्या झटापटीत सोनार यांच्या उजव्या हात व पायाला जखमा झाल्या. 

घटनेची माहिती नरेंद्र दुट्टे, राजू तराळ ,मोहन बेलदार तसेच नरवेल गावचे सरपंच मोहन महाजन यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले .पोलीस अधीक्षक यांना भ्रमणध्वनीवरून या संदर्भात माहिती देण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगाव