जळगावात घर, बांधकाम कामगारांचे जेलभरो आंदोलन

By Admin | Updated: May 30, 2017 16:44 IST2017-05-30T16:44:02+5:302017-05-30T16:44:02+5:30

9 जून रोजी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

Jalbharo movement in Jalgaon house, construction workers | जळगावात घर, बांधकाम कामगारांचे जेलभरो आंदोलन

जळगावात घर, बांधकाम कामगारांचे जेलभरो आंदोलन

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.30 - रेशन धान्य, रॉकेलचा काळाबाजार थांबवा, रोजगार हमी योजनेचे कामे गावोगावी सुरू करा, बांधकाम कामगारांना पाच हजाराचे अनुदान द्या, कामगार कल्याण मंडळाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी सेंट्रर ऑफ इंडियन ट्रेड, फेरीवाले कामगार, शेतमजूर युनियन, बांधकाम कामगार, घरकामगार आदी संघटनांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता आकाशवाणी चौकात जेलभरो आंदोलन केल़े मागण्या मान्य न झाल्यास 9 जून जिल्हा दौ:यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा या संघटनांनी या आंदोलनाव्दारे दिला आह़े
महात्मा गांधी उद्यानात 11 वाजता महिला व पुरूष कामगार एकत्र जमल़े या ठिकाणी कामगारांची सभा झाली़ सभेला कॉ़ विजय पवार, कॉ़ प्रकाश चौधरी यांनी मार्गदर्शन केल़े यानंतर 11़30 वाजेच्या सुमारास उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली़ आकाशवाणी चौकात पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतल़े व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेल़े 

Web Title: Jalbharo movement in Jalgaon house, construction workers