जॉजिर्याच्या दोघांना 36 दिवस कैद

By Admin | Updated: March 11, 2016 00:37 IST2016-03-11T00:37:06+5:302016-03-11T00:37:06+5:30

बांगडय़ांची चोरी केल्याचे सिद्ध

Jailed couple imprisoned for 36 days | जॉजिर्याच्या दोघांना 36 दिवस कैद

जॉजिर्याच्या दोघांना 36 दिवस कैद

 धुळे : मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्समधून सोन्याच्या बांगडय़ांची चोरी केल्याप्रकरणी जॉजिर्या येथील दोन जणांना 36 दिवस कैदेची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारींनी सुनावली आह़े तर एकाची निदरेष मुक्तता केली आह़े

सिमॉनी कॉकरेड्स जेमलेटी (वय 39, ) व मामलुक शेनिजड्स कापोल्ड गिवी (वय 52) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. जिऑर्जी जेमलेटी याची निदरेष मुक्तता झाली आह़े आग्रा रोडवरील अरिहंत ज्वेलर्समधून हातचलाखीने दोन जणांनी एक लाख नऊ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगडय़ा लंपास केल्याची घटना 25 एप्रिल 2015 रोजी उघडकीस आली होती़ दुकान मालक विक्रम तेजराज राठोड (रा़ गुलाबचंद भवानजीनगर, धुळे) यांनी फिर्याद दिली होती.एका चोरीप्रकरणी देवास पोलिसांनी जॉजिर्याच्या तीन जणांना अटक केली होती़ सीसीटीव्ही चित्रीकरणातून बांगडय़ा लंपास करणारे वरील दोन्ही आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना अटक करण्यात आली होती. सरकारपक्षातर्फे फिर्यादी विक्रम राठोड, तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय मिस्तरी आदींच्या साक्ष झाल्या.

Web Title: Jailed couple imprisoned for 36 days