जे. टी . महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे सीईटी सराव परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:39+5:302021-08-26T04:19:39+5:30
फैजपूर, ता. यावल : येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीईटी ...

जे. टी . महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे सीईटी सराव परीक्षा
फैजपूर, ता. यावल : येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा सराव व्हावा म्हणून मोफत ऑनलाइन सीईटी परीक्षेचे आयोजन २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना या प्रकारच्या पाच परीक्षा देता येतील व सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरूनच मोबाइल किंवा लॅपटॉपद्वारे परीक्षा देऊ शकतो. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याला चॅप्टरनुसार रिझल्ट ॲनॅलिसिस व सोल्युशन मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी खूप फायदा होणार आहे.
विद्यार्थी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात https://www.testkatta.com/stdregeng.php?s=641
विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत सराव परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष शरद महाजन, संचालक मंडळ, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. डी. नारखेडे, सर्व विभागप्रमुख, डीन अकॅडमिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. जी. ई. चौधरी, डॉ. के. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.