आयटीआय प्रवेशास ३ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 22:14 IST2017-08-01T22:07:19+5:302017-08-01T22:14:58+5:30
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रियेसाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयटीआय प्रवेशास ३ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ
आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.१-शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रियेसाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन प्रवेशास अडचणी येत असल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहु नये म्हणून ही मुदतवाढ करण्यात आली आहे. १ आॅगस्टपर्यंत शहरातील आयटीआय च्या ९०४ जागांसाठी ४७९ प्रवेश झाले आहेत.
तसेच आयटीआय प्रवेशाच्या इतर फेºयांचे वेळापत्रक देखील मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. दुसºया फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ आॅगस्ट पर्यंत आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. ६ रोजी यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तर ७ ते १० आॅगस्ट दरम्यान दुसºया फेरीतील विद्यार्थी प्रवेश घेवू शकणार आहेत. तर तिसºया फेरीसाठी ७ ते १० आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना आॅनलार्ईन अर्ज करायचे आहेत. १३ रोजी तिसºया फेरीतील यादी जाहीर झाल्यानंतर १४ ते १७ दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहेत. तर चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना १४ ते १७ दरम्यान अर्ज करायचे आहेत. २० आॅगस्ट रोजी चौथ्या फेरीची यादी जाहीर झाल्यानंतर २१ ते २४ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थी प्रवेश घेवू शकतील.