सैनिकांच्या परिवाराची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:25+5:302021-08-17T04:23:25+5:30

भुसावळ येथे शिवसेना माजी नगरसेवक दीपक धांडे व शारदा धांडे यांच्यातर्फे श्रीनगर भागात आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार ...

It is the duty of all of us to take care of the families of the soldiers | सैनिकांच्या परिवाराची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य

सैनिकांच्या परिवाराची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य

भुसावळ येथे शिवसेना माजी नगरसेवक दीपक धांडे व शारदा धांडे यांच्यातर्फे श्रीनगर भागात आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

‘मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू’ हे गीत म्हणून पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, माजी नगराध्यक्षा माधुरी फालक, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, नगरसेवक मनोज बियाणी उपस्थित होते.

प्रास्ताविक दीपक धांडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे, प्रा. धीरज पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, स्वप्निल सावळे, पवन नाले, विभागप्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख पिंटू भोई, चेतन भोई, किरण बढे, अशोक धांडे, प्रसिद्धीप्रमुख गोकूळ बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

प्रथम पारितोषिक चक्रधर यावलकर, द्वितीय पारितोषिक विकास जंजाळे, तृतीय पारितोषिक संजय सुरवाडे तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक लिशा केदारे यांना मिळाले. विनोद निगम, डी. एम. लोडे, जितेश मराठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

160821\16jal_3_16082021_12.jpg

‘दिल दिया है जान भी देंगे’ अंगावर शहारे आणणारे गीत सादर करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, सोबत उद्योगपती मनोज बियाणी

Web Title: It is the duty of all of us to take care of the families of the soldiers