जल व्यवस्थापन सभेत पुन्हा गाजला गौण खनिजाचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:07+5:302021-09-15T04:22:07+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता छत्रपती शाहू महाराज सभागृहात जलव्यवस्थापन सभा पार पडली. या ...

जल व्यवस्थापन सभेत पुन्हा गाजला गौण खनिजाचा मुद्दा
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता छत्रपती शाहू महाराज सभागृहात जलव्यवस्थापन सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया व जल व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या सभेच्या सुरुवातीलाच पल्लवी सावकारे यांनी गौण खनिजाचा मुद्दा उपस्थित करून, कारवाईबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. सावकारे यांनी दोन वर्ष होत असतानांही प्रशासनाकडून गौण खनिजाबाबत ठोस कारवाई झालेली नाही. आता नवनियुक्त सीईओ पंकज आशिया यांच्याकडेदेखील या गैरव्यवहाराबाबत पुरावे सादर केले आहेत. त्यांनी याबाबत अहवाल तयार करण्याच्या सूचना देऊनही अद्याप अहवाल का तयार झाला नाही, अशी विचारणा केली. यावर पंकज आशिया यांनी अहवाल तयार झालेला आहे. लवकरच प्रशासनाकडून गुन्हे दाखल करून, कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन या सभेत दिले.