शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील रिक्त ११,५०० जागांचा प्रश्न महिनाभरात निकाली; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

By विजय.सैतवाल | Updated: October 15, 2022 17:26 IST

शिक्षकांच्याही ५० हजार जागांची लवकरच भरती

जळगाव : राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासोबतच शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागादेखील लवकरच भरल्या जातील, असेही महाजन यांनी ‘लोकमत’ भेटीदरम्यान सांगितले.

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष लक्ष दिलेच नाही व ही भरती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. मात्र आता या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याचदिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन म्हणाले. महिनाभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले. 

शिक्षण विभागातीलही ‘बॅकलॉग’ लागणार मार्गीआरोग्य विभागासह शिक्षकांच्यादेखील जवळपास ४० ते ५० हजार जागा रिक्त असून त्यादेखील लवकरच भरण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. शिक्षक भरती हा विषयी शिक्षण विभागाचा असला तरी आपल्याकडे ग्रामविकास खाते असल्याने जिल्हा परिषदेशी तो निगडीत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांशी आपण यावर चर्चा केली असून त्याविषयीचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे महाजन म्हणाले.

 

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्यGirish Mahajanगिरीश महाजन