सीसीसीतील जेवणाचा विषय थेट मुख्‍यमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST2021-03-19T04:16:19+5:302021-03-19T04:16:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधील जेवणाबाबत दिवसेंदिवस तक्रारीत वाढ होत असून, एका रुग्णाने ...

The issue of CCC meal is directly with the Chief Minister | सीसीसीतील जेवणाचा विषय थेट मुख्‍यमंत्र्यांकडे

सीसीसीतील जेवणाचा विषय थेट मुख्‍यमंत्र्यांकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधील जेवणाबाबत दिवसेंदिवस तक्रारीत वाढ होत असून, एका रुग्णाने याची थेट मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेलने तक्रार केली असून, याची दखल घेत वरिष्ठ पातळीवर याकडे लक्ष्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

दोन दिवसांपूर्वी या केंद्रावर जेवणाची गुणवत्ता खराब असल्याने महिलांनी तक्रार केली होती. शिवाय काही रुग्णांनी जेवणाची पाकिटे थेट कचऱ्याच्या डब्यात टाकली होती. स्वयंपाक बनविणाऱ्या व्यक्तीवर रुग्णांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. सकाळच्या रस्यात सायंकाळी वेगळी भाजी देऊन वेळ काढूपणा सुरू असल्याच्या या तक्रारी होत्या. आम्हाला औषधी घ्यावी लागते, कमी द्या; पण किमान चांगले जेवण द्या, अशी मागणी महिला रुग्णांनी केली होती. अखेर एका रुग्णाने याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

Web Title: The issue of CCC meal is directly with the Chief Minister