वाशिममधील इसमाचा चाळीसगावात गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 08:21 PM2020-12-09T20:21:58+5:302020-12-09T20:21:58+5:30

नागद-चाळीसगाव रस्त्यालगत जावळे एका इसमाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Isma in Washim hanged in Chalisgaon | वाशिममधील इसमाचा चाळीसगावात गळफास

वाशिममधील इसमाचा चाळीसगावात गळफास

Next
ठळक मुद्देमयत पोहे, ता. जि. वाशिम येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाघडू, चाळीसगाव : जावळे गावाजवळ नागद-चाळीसगाव रस्त्यालगत जावळे येथील गोविंद दालचंद परदेशी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा इसम पोहे, ता. जि. वाशिम येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून त्या तरुणाचे नाव श्रीकृष्ण गोविंद इंगोले असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा तरुण इकडे कसा आला त्याने इकडे गळफास का घेतला असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी जावळेच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Isma in Washim hanged in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.