महावितरण कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:51+5:302021-08-21T04:21:51+5:30
यावेळी अभियंता संघटनेचे मंडळ सचिव देवेंद्र भंगाळे, सहसचिव योगेश भंगाळे, मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, विभागीय सचिव एस. डी. ...

महावितरण कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनियमितता
यावेळी अभियंता संघटनेचे मंडळ सचिव देवेंद्र भंगाळे, सहसचिव योगेश भंगाळे, मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, विभागीय सचिव एस. डी. चौधरी, विशाल आंधळे, मिलिंद इंगळे, हेमंत खांडेकर, मोहन भोई, विकास कोळंबे, रत्ना पाटील, प्रतिभा पाटील, अजय वाणी, हर्षल नेहेते, अमोल चौधरी, रवींद्र शिरसाठ, आर. एन. पाटील, मयूर भंगाळे, विवेक चौधरी आदी अभियंता उपस्थित होते. एकाच अभियंत्याची प्रशासकीय विनंती बदली करणे, विनंती बदलीच्या जेष्ठता यादीतील अनुक्रमे डावलणे, दीर्घ कालावधी बदलीस पात्र अभियंत्यांची जाणीवपूर्वक गैरसोयीची बदली करणे आदी प्रकारची अनियमिता महावितरण प्रशासनाने केल्याचा आरोप सबॉर्डिनेट अभियंता संघटनेने केला आहे.
इन्फो :
जळगाव परिमंडळाचा मुख्य अभियंता पदाचा तात्पुरता पदभार मी नुकताच स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत माहिती घेऊन, पुढील कारवाई करण्यात येईल.
फारूख शेख, अधीक्षक अभियंता तथा प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ.