फत्तेपूर, ता.जामनेर/वेळोदे, ता.चोपडा : दोन वेगवेगळ्या अपघातात जामनेर तालुक्यात लोणीच्या वृद्धाचा व चोपडा तालुक्या तील वेळोदे येथील इसमाचा मृत्यू झाला. दोघेही जागीच ठार झाले.तोंडापूर-कुंभारी रस्त्यावर मोटारसायकलची बैलगाडीला धडकफत्तेपूर, ता.जामनेर : येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी येथील देवराव माधव घुले (वय ६५) यांचा १२ रोजी सकाळी अपघाती मृत्यू झाला. ते आपल्या औरंगाबाद येथील डॉक्टर मुलाला भेटण्यासाठी मोटारसायकलने जात होते. तेव्हा तोंडापूर ते कुंभारी रस्त्याच्या दरम्यान समोरून येणाऱ्या बैलगाडीने त्यांच्या मोटारसायकलला जबरदस्त धडक दिली. त्यात बैलगाडीची लोखंडी दांडी त्यांच्या पोटात घुसली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. जामनेर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी लोणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून असा परिवार आहे. ते डॉ.सागर घुले यांचे वडील होत.ट्रकची सायकलला धडकचोपडा-शिरपूर रस्त्यावर गंगे गावाजवळ अनेर नदीच्या पुलावर येथील अशोक बोरसे (वय ५९ ) यांचे अपघाती निधन झाले. अशोक बोरसे हे वेळोदे येथील अल्पभूधारक शेतकरी असून, ते आपल्या गाईसाठी चारा घेण्यासाठी तोंडे हद्दीतील शेतात गेले होते. तेथून चारा घेऊन सायकलवर परत होते. तेव्हा नदीच्या पुलावर अर्ध्यावर आल्यानंतर शिरपूरकडून येणाºया ट्रक (१०-डब्ल्यू-७१२८) ने धडक दिल्याने अशोक बोरसे हे जागीच ठार झाले. चालक आणि क्लिनर ट्रक सोडून पसार झाले. तब्बल दोन तास उशिराने पोलीस आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
लोखंडी दांडा पोटात घुसल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:43 IST