शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्टा प्रकरण, चोपडा येथील घनश्याम अग्रवाल मुख्य बुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:47 IST

रायगड पोलिसांकडून कसून चौकशी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणारे व त्याचे सौदे एकमेकांना देणाऱ्यांची मोठी साखळी आहे. या साखळीत चोपडा येथील भाजपाचे नेते घनश्याम अग्रवाल हे मुख्य बुकी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.पुणे व रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी खालापूर पोलिसांच्या मदतीने ३ मे रोजी मुंबई-पुणे महामार्गावर लिला ईन या लॉजिंगवर धाड टाकली होती. त्यात पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांनी पुण्यातील चार मोठ्या बुकींची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन घनश्याम अग्रवाल यांचे नाव समोर आले. त्यानुसार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.असा घेतला जातो सट्टाआंतरराष्टÑीय सामन्यांपेक्षा आयपीएलची वाढत जाणारी लोकप्रियता पाहता या सामन्यांवर सट्टा लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ कोणता संघ जिंकेल किंवा किती धावा करेल यावरच सट्टा लावला जात होता. मात्र, व्टेंटी-व्टेंटी सामन्यांचे प्रमाण वाढल्यानंतर टॉस पासून तर सामन्याचा ‘मॅन आॅफ द मॅच’ वर देखील सट्टा लावला जात आहे.सामना सुरु होण्याआधी संघाच्या अकरा खेळाडूंमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल यावर सट्टा लावला जातो. सामन्याचा टॉस कोणता संघ जिंकेल यावर बुकींच्या नजरा असतात, टॉस वर केवळ मोठे बुकीच सट्टा लावतात. मात्र टॉस झाल्यानंतर सामन्याचा सट्टा लावण्याचे प्रमाण वाढत असते. यासाठी बुकी आता आॅनलाईन व अ‍ॅपचा देखील वापर करत आहेत.घनश्याम अग्रवाल याच्याकडे भाजप नेत्यांची ‘उठबस’घनश्याम अग्रवाल हे भाजपाच्या केंद्रीय समितीचे माजी सदस्य आहे. जिल्ह्यातील असो की राज्यातील दिग्गज नेते चोपडा शहरात आले की अग्रवाल याच्या निवासस्थानी आवर्जून भेट देतात. चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था अग्रवाल याच्याकडून केली जाते.पहिलीच कारवाई...आॅनलाईन सट्टा असो की क्रिकेटचा सट्टा किंवा नियमित सट्टा या व्यवसायात घनश्याम अग्रवाल मुख्य बुकी आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या व्यवसायत असतानाही भाजप नेत्यांशी जवळीक असल्याने अग्रवाल याच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नव्हती. आता खालापूर पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारी एक मोठी साखळी आहे. दोन टप्प्यात आरोपींना अटक झाली. पुण्यातील बुकीच्या चौकशीत घनश्याम अग्रवाल याचे नाव पुढे आले. अग्रवाल हा देखील दुसºया बुकीकडे आकडे देतो, त्यामुळे तो बुकी कोण, याची साखळी कशी आहे याची चौकशी सुरु आहे. -जमील शेख, पोलीस निरीक्षक, खालापूर, जि.रायगड

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव