श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे जनार्दन हरीजी महाराजांनाही आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:14 IST2020-07-28T21:09:05+5:302020-07-28T21:14:08+5:30

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी फैजपूर येथील जनार्धन हरीजी महाराज यांनाही आमंत्रण आले आहे.

Invitation to Janardan Hariji Maharaj for Bhumi Pujan of Shri Ram Temple | श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे जनार्दन हरीजी महाराजांनाही आमंत्रण

श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे जनार्दन हरीजी महाराजांनाही आमंत्रण


फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येत्या ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील काही संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांचाही समावेश आहे.
परमपूज्य महामंडलेश्वर या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला २ ऑगस्ट रोजी जाणार आहे. तत्पूर्वी दि. १ ऑगस्टला ते चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमावर जाऊन या पवित्र नद्यांचे जल आणून विधीवत पूजन करणार आहे. ते पवित्र जल घेऊन अयोध्याला प्रस्थान करणार आहे, असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

Web Title: Invitation to Janardan Hariji Maharaj for Bhumi Pujan of Shri Ram Temple