शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

जामनेरात कॉँग्रेसच्या पाठीशी विरोधकांच्या अदृश्य हातांचे बळ : जिल्हा प्रभारी विनायक देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 4:44 PM

मुख्यमंत्र्यांनंतर मीच असे म्हणणाºया मंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसने हिमतीने लढवावी, असा संदेश सर्वच पक्षांकडून येत आहे, या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी जिल्ह्यातूनच अदृश्य हातांचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देजामनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात निवडणूकभाजपात गेलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना आता तिकिट नकोनिवडणुकीसाठी विरोधकांचे पाठबळ मिळणार

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.२७ : मुख्यमंत्र्यांनंतर मीच असे म्हणणाºया मंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसने हिमतीने लढवावी, असा संदेश सर्वच पक्षांकडून येत आहे, या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी जिल्ह्यातूनच अदृश्य हातांचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी केले.जामनेर नगरपालिकेची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर गांधी चौकातील मंगल कार्यालयात शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात ते बोलत होते. राज्याचे राजकारण बदलविणारी निवडणूक म्हणून जामनेर पालिकेच्या निवडणुकीकडे पाहिले जाणार असल्याचे ते म्हणाले.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील होते. सुरुवातीला माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी ही निवडणूक लढविण्यासंदर्भात आपली शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीशी चर्चा झाल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या सहप्रभारी डॉ. हेमलता पाटील यानी सांगितले की, नाशिक महानगरपालिका निवडणुकीत जामनेरचा पैसा ओतला गेला.माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांच्या नावाखाली डागडुजीचे कामे सुरू आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, ज्योत्स्ना विसपुते, शंकर राजपूत, अशपाक पटेल, गणेश झाल्टे, नगरसेवक जावेद मुल्ला, अनिस पठाण, शेख खालीद शेख रईस, रऊफ पठाण, पी.जे.सुरवाडे, गुणवंत हिवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या चिन्हावर निवडून आलेल्यापैकी काही नगरसेवक हे भाजपात सहभागी झाले. या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी खालीद शेख यांनी केली. बैठकीस डी.जी.पाटील, भगवान पाटील, मूलचंद नाईक, राजू भोईटे, रफीक मौलाना, प्रभू झाल्टे, अ‍ॅड.आर.एस. मोगरे, संतोष झाल्टे, इद्रीस पटेल, गोपाल राजपूत, रऊफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर