यावलमधील आॅनर किलिंगप्रकरणी तपास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:22 IST2018-12-24T21:20:43+5:302018-12-24T21:22:19+5:30
यावल येथील महाजन गल्लीतील २३ वर्षीय घटस्फोटीत युवतीचा चार दिवसांपूर्वी कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तिसºया दिवशीही चौकशी सुरूच होती.

यावलमधील आॅनर किलिंगप्रकरणी तपास सुरूच
यावल, जि.जळगाव : यावल येथील महाजन गल्लीतील २३ वर्षीय घटस्फोटीत युवतीचा चार दिवसांपूर्वी कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तिसºया दिवशीही चौकशी सुरूच होती. सोमवारी मयत तरूणीच्या लहान-भावा-बहिणीचे पोलिसांनी जवाब नोंदवले ओहत, तर मयत तरूणी आजाराने मृत पावल्याचे कुटुंबियाकडून सांगण्यात आल्याने तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांचेही जवाब घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डी.के.परदेशी, फौजदार सुनीता कोळपकर, कॉ.संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.
गुरुवारी शहरातील २३ वर्षीय घटस्फोटीत तरूणीचा मृत्यू झाला असून, ती गरोदर होती आणि तिच्या कुटुंबियांकडूनच तिचा घातपात करण्यात आल्याचा आरोप तिच्या प्रियकराने केला आहे. यामुळे या आॅनर किलिंग प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.
या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उपअधीक्षक रायसिंग यांनी या ्रप्रकरणी कसून तपास करीत असल्याचे सांगून सत्य शोधण्यात येईल, असे यापूर्वीच सांगितले आहे.
आॅडियो क्लिप व्हायरल
दरम्यान, मयत युवतीच्या प्रियकराची व युवतीच्या आईसोबतच्या संभाषणाची एक आॅडियो क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तिचा प्रियकर युवतीच्या आईला म्हणतो की, काकू तिला तुम्ही काही कमी-जास्त करू नका, गर्भ काढायचा असल्यास मी पैसे देतो, वाटल्यास मी सोबत येतो, मात्र तिची आई त्याला सांगते की, ती नाही म्हणते आणि तू यापुढे फोन करू नकोस, तो तिच्याशी फोनवर बोलायचे म्हणतो, तेव्हा ती फोनवर बोलावयास तयार नाही, तेव्हा तो घरी येण्याचे म्हणतो, तर तिची आई तू जर आलास तर मार खाशील आणि आम्ही पोलिसाकडे तुझी तक्रार करू , ही व्हायरल झालेली क्लिप नेमकी खरी आहे किंवा बनावट याबाबतही पोलिसांनी तपासून पाहावी, अशी चर्चा होत आहे.