पाणी योजनांमधील गैरव्यवहारांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 05:16 IST2020-01-06T05:16:04+5:302020-01-06T05:16:08+5:30
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल तसेच पाणी योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

पाणी योजनांमधील गैरव्यवहारांची चौकशी
जळगाव : राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल तसेच पाणी योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जास्तीत जास्त जनतेत राहून त्यांचे प्रश्न मार्गी लावता येणार आहेत, त्यासाठी हवे ते प्रयत्न करणार असुन आपल्या सर्वांचं सहकार्य हवे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.