तपासणीत आढळले विद्यापीठातील ५ कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:10+5:302021-03-28T04:16:10+5:30
१९२ जणांची ॲन्टीजेन चाचणी : आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक विद्यापीठात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर ...

तपासणीत आढळले विद्यापीठातील ५ कर्मचारी पॉझिटिव्ह
१९२ जणांची ॲन्टीजेन चाचणी : आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक विद्यापीठात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी शुक्रवारी धरणगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले होते. यावेळी १९२ कर्मचाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यात ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
ॲन्टीजेन तपासणीला सकाळी ११ वाजेपासून सुरुवात झाली. यावेळी एरंडोल व धरणगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. नरेश पाटील, डॉ. प्रीती पाटील , डॉ. सायमा खान, डॉ. निलोफर शेख, डी. एच. सैंदाणे चांदसर, प्रशांत एस. पाटील, प्रशांत एम. चौधरी, अतुल बी. नन्नवरे यांची उपस्थिती होती. यांच्या उपस्थितीत अँटीजेन व आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साधारणत: १९२ अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या. त्यात ५ पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यांना पुढील तपासणीसाठी कोविड सेंटरकडे पाठविण्यात आले.