मनपा रुग्णालयातून इन्व्हर्टरची बॅटरी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST2021-05-25T04:18:02+5:302021-05-25T04:18:02+5:30
जळगाव : पिंप्राळा हुडको येथील महापालिकेच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रुग्णालयातील इन्व्हर्टरची १५ हजार रुपये किमतीची बॅटरी लांबविल्याची घटना ...

मनपा रुग्णालयातून इन्व्हर्टरची बॅटरी लांबविली
जळगाव : पिंप्राळा हुडको येथील महापालिकेच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रुग्णालयातील इन्व्हर्टरची १५ हजार रुपये किमतीची बॅटरी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता समोर आली असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंप्राळा हुडको येथे महापालिकेचे रुग्णालय आहे. सकाळी ८ वाजता रुग्णालय सुरू होते, यानंतर संध्याकाळी ६ वाजता बंद होते. २२ मे रोजी शनिवार असल्याने दुपारी १ वाजता रुग्णालय बंद करण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी रविवारी सुटी असल्याने रुग्णालय बंद होते. शनिवारी दुपारी १ वाजेपासून ते रविवारी रात्रीदरम्यानच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी रुग्णालयाचा मागील बाजूचा दरवाजा तोडून रुग्णालयातील १५ हजार रुपये किमतीची इन्व्हर्टरची बॅटरी लांबविली. सोमवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे शिपायाने रुग्णालय उघडले असता, रुग्णालयाचा मागील बाजूचा दरवाजा तुटलेला तर रुग्णालयातील इन्व्हर्टरची बॅटरी गायब असल्याचे दिसून आले. शिपाई सुनील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.