पाचोरा अग्रवाल समाजाचा युवक-युवती परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:49+5:302021-09-14T04:20:49+5:30

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अग्रवाल समाजातर्फे कुठल्याही प्रकारचा युवक-युवती मेळावा ...

Introductory meeting of youth of Pachora Agarwal community | पाचोरा अग्रवाल समाजाचा युवक-युवती परिचय मेळावा

पाचोरा अग्रवाल समाजाचा युवक-युवती परिचय मेळावा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अग्रवाल समाजातर्फे कुठल्याही प्रकारचा युवक-युवती मेळावा समोरासमोर घेण्यात आलेला नव्हता. गेल्या दोन वर्षांमध्ये अग्रवाल समाजातर्फे ऑनलाइन मेळावे अनेक वेळा आयोजित करण्यात आले होते. परंतु त्या मेळाव्यामध्ये खूप विवाह जमू शकले नाहीत; त्यामुळे या मेळाव्यात महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश, गुजरात येथूनदेखील युवक-युवती परिचय देण्यासाठी आले होते.

या वेळी आलेल्या समाजबांधवांसाठी चहा, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था राधेश्याम अग्रवाल, सीताराम अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात आली होती. मेळाव्याप्रसंगी अग्रवाल समाज अध्यक्ष मोहन अग्रवाल, अग्रवाल फ्रेंड्स ग्रुप अध्यक्ष सीताराम अग्रवाल, अग्रवाल नवयुवक मंडळ अध्यक्ष निखिल मोर, अग्रवाल महिला मंडळ अध्यक्षा संगीता अग्रवाल, अग्रवाल बहु मंडल अध्यक्षा टीना अग्रवाल, माजी समाज अध्यक्ष जगदीश पटवारी, रमेश मोर, राजेश पटवारी, अनुप अग्रवाल, सतीश पटवारी, लक्ष्मीकांत पटवारी, गोपाल पटवारी, नवनीत मोर, संजय सावा, पवन अग्रवाल, रमेश अग्रवाल, दिनेश अग्रवाल, रवी मोर, संजय पटवारी, राजेश (बाबूजी) मोर, किशोर अग्रवाल, विवेक मोर, किशन मोर, गौरव मोर, गौरव अग्रवाल, लवकित अग्रवाल, राजेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, कौस्तुभ मोर, विशाल पटवारी, नितेश अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजबांधवांनी मेळावा यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.

130921\save_20210913_184159.jpg

युवक-युवती परिचय मेळाव्यात परिचय करून देताना युवक आणि युवती

Web Title: Introductory meeting of youth of Pachora Agarwal community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.