धमकीबाज मातब्बर नेते गजाआड
By Admin | Updated: October 3, 2015 00:49 IST2015-10-03T00:49:29+5:302015-10-03T00:49:29+5:30
जळगाव : पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाच धमकी दिल्याने दोन मातब्बर नेत्यांसह चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

धमकीबाज मातब्बर नेते गजाआड
जळगाव : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नीता चव्हाण यांचे पती राजेंद्र चव्हाण व गाढोदा येथील उपसरपंच गोपाळ फकीरचंद पाटील यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रय} करणा:या पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाच धमकी दिल्याने या दोन्ही नेत्यांसह चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. जळगाव तालुक्यातील या दोन्ही मातब्बर नेत्यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली. तरुणाच्या मृत्यूनंतर आरोप-प्रत्यारोप जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गाढोदा येथील तरुणाचा मागील महिन्यात मृत्यू झाला होता. या अपघाताला राजेंद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गाढोदा येथील उपसरपंच गोपाळ पाटील, राजेंद्र युवराज पाटील यांनी केली होती. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर दशक्रियाविधी व मुंडन करण्याची धमकी पाटील यांनी दिली होती. या प्रकरणातून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांना पोलीस स्टेशनला बोलविले दररोज दोन्हींकडून पोलीस स्टेशनला एकमेकांच्या विरुध्द तक्रारी केल्या जात होत्या. या प्रकाराला आळा बसावा यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी शुक्रवारी दोघांना बोलावले होते. दोघे म्हणतात जीवाला धोका.. गोपाळ पाटील यांच्यासोबत राजेंद्र युवराज पाटील व ढेकू रामसिंग पाटील (दोन्ही रा.गाढोदा)होते. अपघातात ज्या तरुणाचा जीव गेला त्या कुटुंबातील सदस्यांना ही राजकारण नको आहे. त्यामुळे आपसात समजोता करुन हा वाद येथेच थांबविण्याची विनंती केली. मात्र दोघंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोपाळ पाटील यांनी रिव्हॉल्वरने उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे त्याच्यापासून जीवाला धोका असल्याचे चव्हाण यांनी सांगितले तर चव्हाण यांच्यापासूनही आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून माङया जीवाचे काही बरे-वाईट झाले तर त्याला पोलीस निरीक्षकच जबाबदार राहतील अशी धमकी पाटील यांनी दिली. त्यामुळे सीआरपीसी 151 नुसार दोघांना अटक करून 107 अन्वये कारवाई करुन तहसीलदारांकडे पाठविण्यात आले. राजेंद्र युवराज पाटील व ढेकू रामसिंग पाटील यांनाही अटक करून कोठडीत ठेवण्यात आले. संध्याकाळी चौघांची जामिनावर सुटका करण्यात आली. दवाखान्यात दिली धमकी राजेंद्र चव्हाण हे गुरुवारी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या नातवाला पाहण्यासाठी डॉ.नंदिनी आठवले यांच्या दवाखान्यात आले होते. तेथे गोपाळ पाटील, ढेकू पाटील व राजेंद्र पाटील यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तर चव्हाण यांनीही आपल्याला धमकी दिली असा आरोप केला. दोघांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यानंतर चव्हाण यांना एका मोबाईलवरून तू कुठेही जा तुला मारल्याशिवाय राहणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी त्या क्रमाकांचा शोध घेतला असता तो चंद्रशेखर पाटील, 27/सी स्टेडियम कॉम्प्लेक्स यांचा निघाला.