जीएमसीत विविध पदांसाठी ५० जणांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:09+5:302021-07-10T04:13:09+5:30
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्तपदांसाठी समुपदेशन मुलाखत प्रक्रिया ...

जीएमसीत विविध पदांसाठी ५० जणांच्या मुलाखती
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्तपदांसाठी समुपदेशन मुलाखत प्रक्रिया शुक्रवारी पार पडल्या. दैनंदिन रुग्णसेवेच्या दृष्टीने महाविद्यालय व रुग्णालय आस्थापनेवरील अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विषयातील सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त असलेली पदे १२० दिवसांच्या कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपासून प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आल्या. यात सहायक प्राध्यापक पदाच्या १७ विषयांच्या ३१, वरिष्ठ निवासी पदाच्या ११ विषयांच्या २५ तर ९ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलने या समुपदेशन मुलाखती घेतल्या. यात सहायक प्राध्यापक पदाच्या १३ विषयांच्या ३०, वरिष्ठ निवासी पदाच्या ६ विषयांच्या १०, तर १० वैद्यकीय अधिकारी पदासाठी एकूण ५० जणांनी मुलाखती दिल्या.