चाळीसगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:12+5:302021-09-24T04:19:12+5:30

परिषदेसाठी संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल यांनी शुभेच्छा देऊन ई-परिषदेस सुरुवात झाली. परिषदेसाठी संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, ...

International e-conference at Chalisgaon College | चाळीसगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषद

चाळीसगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषद

परिषदेसाठी संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल यांनी शुभेच्छा देऊन ई-परिषदेस सुरुवात झाली. परिषदेसाठी संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. बी. व्ही. पवार, जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, ई-परिषदेचे संयोजक व भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजय बाविस्कर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. अजय वा. काटे उपस्थित होते.

पहिल्या सत्रात प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी (यूएसए) यांनी आपल्या बीज भाषणात कृषी, उद्योगधंदे, पर्यटन आणि सेवा क्षेत्र यांची शास्वत विकासात असलेली भूमिका मांडली. डॉ. बाबालोला सॅम्युअल (नायजेरिया) यांनी विकसनशील व विकसित देशातील शाश्वत विकासावर प्रकाश टाकला. डॉ. मुहम्मद यासिर (चीन) व, डॉ. मुहम्मद ताहीर खान (पाकिस्तान) यांनी शाश्वत विकासात वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे महत्त्व विशद केले.

यानंतर प्रा. कॅप्टन डॉ. एस. सी. अडवितोटे (भारत) यांनी भारतातील सामाजिक आर्थिक घटकांचा प्रादेशिक विषमतेवर होणारा परिणाम यावर आपले मत मांडले. शेवटच्या सत्रात शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले.

भारतातील विविध आंतरविद्याशाखांमधून एकूण १७० शोधनिबंध स्वीकारण्यात आले. तसेच या परिषदेसाठी प्रा. डी. एल. वसईकर, डॉ. ए. डी. शेळके, डॉ. ए. बी. सावरकर, प्रा. एम. व्ही. चुडे, प्रा. पी. जी. वाघमारे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. एम. एस. पाटील यांनी तर भूगोल विभागातील डॉ. व्ही. डी. चौधरी, प्रा. किशोर डी. पाटील, डी. यू. पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार व्यक्त केले. तसेच परिषदेच्या यशस्वीतेसाठी हिंमत अंदोरे, मनोहर निकम, दिलीप शेटे, राजू पवार व रघुनाथ खलाल यांचे सहकार्य लाभले.

Web Title: International e-conference at Chalisgaon College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.