सफाई ठेक्याच्या ठरावात परस्पर बदल

By Admin | Updated: October 10, 2015 01:31 IST2015-10-10T01:31:29+5:302015-10-10T01:31:29+5:30

जळगाव : मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात येणा:या साफसफाईच्या ठेक्याचा विषय सभागृहात मंजूर झाल्यावरही त्यात बदल करण्यात आला आहे.

Interconnection of the contract for cleaning contracts | सफाई ठेक्याच्या ठरावात परस्पर बदल

सफाई ठेक्याच्या ठरावात परस्पर बदल

जळगाव : मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात येणा:या शहरातील साफसफाईच्या ठेक्याचा विषय वादग्रस्त ठरत आहे. प्रभागनिहाय ठेके रद्द करून एकमुस्त दरपद्धतीने ठेका देण्याचा विषय सभागृहात बहुमताने मंजूर झालेला असताना त्यात नंतर बदल करून मक्तेदार लहू रामा पर्वते यांचे 350 कामगार सुरू ठेवण्याच्या मुद्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

मनपातील सफाई ठेक्याचा विषय चांगलाच गाजत आहे. पूर्वी एकमुस्त दरपद्धतीने सफाईचा ठेका देण्यात आला होता. मात्र मनपा आयुक्तपदी संजय कापडणीस आल्यावर त्यांनी हा मक्ता रद्द करून प्रभागनिहाय मक्ता देण्याचा प्रस्ताव आणला. त्याच वेळी हा प्रभागनिहाय मक्ता अधिक महागात पडेल, असे आकडेवारीवरून दिसत असतानाही निविदा प्रक्रिया राबविली गेली.

25 पैकी 9 प्रभागांमध्येच प्रतिसाद मिळाल्याने तेथे मक्ता देण्यात आला. मात्र त्यातही नगरसेवकांनीच दुस:या नावाने ठेका घेतलेला असल्याने प्रशासनाशी हातमिळवणी करून 5-7 कर्मचा:यांमध्ये काम उरकले जात होते.

एका प्रभागासाठी दरमहा तीन लाख 40 हजार रुपये खर्च येत होता. सर्व प्रभागांसाठी या पद्धतीने ठेका दिल्यास खर्च पूर्वीच्या एकमुस्त दरपद्धतीच्या ठेक्यापेक्षा अधिक जाणार होता. त्यामुळे प्रभागनिहाय ठेके रद्द करण्याची मागणी स्थायी सभेत झाली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव दिला होता.

1174 कामगारांची गरज

एकमुस्त दर पद्धतीने निविदा प्रक्रिया करण्यासाठी आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी रस्त्यांचे क्षेत्रफळ, गटारींची लांबी व किमान क्षेत्रासाठी आवश्यक सफाई कामगार याबाबतचे शासन निर्णय याचा अभ्यास करून शहरात 1174 सफाई कामगारांची आवश्यकता असल्याचा आकडा काढला असल्याचे समजते. मात्र मनपाचे कायम कामगार वगळून उर्वरित कामगारांची संख्या ठरविली जाणार आहे. त्यात खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने आयुक्तच निर्णय घेणार आहेत.

 

Web Title: Interconnection of the contract for cleaning contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.