शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

आधारकार्डवर विद्यार्थिनी व वृद्धेच्या ठश्यांची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:42 IST

उपजिल्हाधिकाºयांच्या कक्षात केली दुरूस्ती

ठळक मुद्देपालकांनी घेतली प्रशासनाकडे धावप्रशासनाचा पुढाकारआॅपरेटरकडून झालेल्या चुकांचा मनस्ताप नागरिकांना

जळगाव : आधार कार्डावर विद्यार्थिनी आणि वृद्धेच्या बोटांच्या ठशांची अदलाबदल झाल्याची तक्रार येताच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थिनीचे नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेवून लगेच दुरुस्ती केली.आधार कार्ड बनविताना आॅपरेटरकडून झालेल्या चुकांचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.  प्रत्येक योजना व शासकीय कामकाजात आधार नोंदणी सक्तीची झाली असल्याने आधारकार्डमध्ये काही चूक झालेली असल्यास ते काम खोळंबत आहेत.दरम्यान एका विद्यार्थिनीच्या आधारकार्डसाठी घेतलेले बोटांचे ठसे एका वृद्ध महिलेच्या बोटांच्या ठशांशी अदलाबदल झाल्याने त्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक भवितव्यच अडचणीत आल्याचे प्रकरण समोर आले. अखेर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थिनीचे नुकसान टाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी कक्षात खास आधारचे युनिट लावून आधारकार्डात दुरूस्ती केली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सध्या १२वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने २०१३ मध्ये आधार नोंदणी केली होती. त्यावेळी रांगेत तिच्या मागे एक वृद्ध महिला होती. आधार नोंदणी करणाºया आॅपरेटरच्या चुकीमुळे या विद्यार्थिनीच्या बोटांचे ठसे व त्या वृद्धेच्या बोटांचे ठसे यात अदलाबदल झाली. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील तसेच एनआयसीचे प्रमोद बोरोले यांनी यात लक्ष घालून युआयडीचे विभागीय अधिकारी चहांदे यांना देण्यासाठी पत्रही तयार केले. दरम्यान कुणी अधिकाºयांनी काही तांत्रिक उपाय सुचविल्याने सोमवार, २६ रोजी उपजिल्हाधिकारी भांडे यांच्या दालनात आधार नोंदणीचे युनिट बसवून या विद्यार्थिनीच्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यात यश न मिळाल्यास युआयडी मुंबई कार्यालयाकडेच धाव घ्यावी लागणार आहे.विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही अडचण सोडविण्यासाठी दाखविलेल्या सहृदयतेचे कौतुक होत आहे.पालकांनी घेतली प्रशासनाकडे धाववृद्ध महिलेला तर आधारची गरज भासली नाही. मात्र सध्या १२वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला मात्र ‘नीट’ परीक्षेच्या नोंदणीसाठी आधारची गरज असल्याने त्याचा वापर करावा लागला. मात्र ठसे बदल असल्याने त्या मुली ऐवजी वृद्धेचे आधारकार्ड येत होते. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली. याबाबत पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली.