तळवेल येथील सधन शेतक:याचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: May 31, 2017 18:16 IST2017-05-31T18:16:33+5:302017-05-31T18:16:33+5:30

शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला.

Intensive Farmers of Talwell: Suspicious Death | तळवेल येथील सधन शेतक:याचा संशयास्पद मृत्यू

तळवेल येथील सधन शेतक:याचा संशयास्पद मृत्यू

ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, जळगाव, दि. 31 -   भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तरुण शेतकरी मिलिंद शालीग्राम राणे (वय 45) यांचा बोहर्डी शेती शिवारातील सोपान निवृत्ती झोपे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला.  त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिलिंद राणे हे गावातील सधन असे शेतकरी होते मात्र मागील काही काळापासून ते कर्जबाजारी होते व त्याच मानसिकतेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. ते नफ्याने दुस:याची शेती करीत होते.
काल रात्री जेवण झाल्यावर ते बाहेर गेले व नंतर रात्रभर ते घरी परतले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह बोहर्डी शिवारात आढळून आले.  पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली.  

Web Title: Intensive Farmers of Talwell: Suspicious Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.