दप्तराचे ओझे कमी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:41 AM2018-09-19T00:41:18+5:302018-09-19T00:55:29+5:30

अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार

Instructions for Implementation of a Deductible Burden Order | दप्तराचे ओझे कमी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

Next
ठळक मुद्दे शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर परीक्षा खासगी शाळेत घेतल्या जातात, मात्र या परीक्षांची वाढती फी पालकांची डोकेदुखी ठरत आहे.शासनाने  अवांतर परीक्षांवर बंदी आणली आहे तरी खासगी शाळेत याचे जोम माजलेले दिसून येत आहे.

चाळीसगाव, जि.जळगाव : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले असून, तसा अहवाल प्रत्येक शाळेने गटशिक्षण अधिकाºयांना द्यावयाचा आहे. याबाबत नियमांचा भंग करणाºया शाळेवर कारवाई केली जाणार आहे.
मागील काही वर्षात विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे ओझे विद्यार्थी वाहून नेत होते. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत होता. याबाबत वैद्यकीय अधिकाºयांनीही जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला होता.
त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर तसा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना सादर करावयाचा आहे. याबाबत संबंधित शाळांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तरांच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्यांचे व पाठदुखींचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दर दिवशी किमान पुस्तके व साहित्यांचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. शासनाने ही परिस्थिती बदलविण्याकरिता ठोस कार्यवाही केली आहे. याबाबत शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आकस्म्सिक तपासणी मोहीम राबविण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन असे असावे
वर्ग वजन
इयत्ता १ ली - १७८५ ग्रॅम
इयत्ता २ री - १८८० ग्रॅम
इयत्ता ३ री - २४०० ग्रॅम
इयत्ता ४ थी - २६८५ ग्रॅम
इयत्ता ५ वी - ३१२५ ग्रॅम
इयत्ता ६ वी - ३१४१ ग्रॅम
इयत्ता ७ वी - ३३५६ ग्रॅम
इयत्ता ८ वी - ३४२५ ग्रॅम
पुस्तके, वह्या कंपासपेटी यांचे वजनाचा समावेश करण्यात आला आहे. यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना तीन पुस्तके दप्तरात असावी, असे शासनाचे निर्देश आहेत.
खासगी शाळा नियमांच्या पलीकडे
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आल्या महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार ‘दप्तर विरहित दिवस’ म्हणून पाळला जात असल्याची माहिती आहे. सन २०१७ मध्ये याबाबत परिपत्रकदेखील काढले. मात्र बºयाच खासगी शाळा या नियमाची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही व खासगी शाळेतील बºयाच मुख्याध्यापकांना याबाबत माहिती नसल्याची बाब उघड होत आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे जास्त असल्याने हाडाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हात-पायांना कमजोरी येऊ शकते. तसेच मानेला व खाद्यांला त्रास होऊ शकतोे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष दखल घ्यावी.
-डॉ.विनोद कोतकर
सचिव, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, चाळीसगाव

जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षकांकडून हा उपक्रम राबविला जात आहे . यासाठी सन २०१७ मध्ये परिपत्रकदेखील काढले. यावर्षी शाळांचा आढावा घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देवू. खासगी शाळांनाही त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.
-बी. जे.पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प., जळगाव




 

Web Title: Instructions for Implementation of a Deductible Burden Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.