शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

जळगावात सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी कामगार निरीक्षकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:06 IST

तासभर ठिय्या

ठळक मुद्देमाथाडी कामगार कार्यालयात घोषणाबाजीकाळे फासण्याचा इशारा

जळगाव : सुरक्षारक्षक मंडळाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती न दिल्याने, जळगाव,धुळे, नंदुरबार येथून आलेल्या संतप्त युवकांनी सोमवारी कामगार निरीक्षक सी.पी. पाटील यांना घेराव घातला. यावेळी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनीही युवकांना पाठिंबा दिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी तासभर या ठिकाणी माथाडी कामगार कार्यालयात ठिय्या मांडला होता.शासनातर्फे धुळे, नंदुरबार व जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षारक्षक पदासाठी २०१५ मध्ये ५०० जागासांठी सुमारे ८ हजार युवकांनी अर्ज केले होते. त्यानंतर २६ ते २८ मार्च २०१६ या तीन दिवसांच्या कालावधीत युवकांच्या शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात आल्या होत्या.यातील ५०० जागांपैकी २७६ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. मात्र, मंडळातर्फे या पात्र उमेदवारांना दोन वर्षांपासून नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही.यासाठी गेल्या दोन वर्षांपासून हे उमेदवार माथाडी व असंघटीत कामागार मंडळाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, येथील अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविला असल्याचेच उत्तर देण्यात येत होते. यावेळी काही गेल्या महिन्यात धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्र्यांचींही भेट घेतली होती.दोन वर्षांपासून पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने, माजी आमदार शरद पाटील यांनी गेल्या महिन्यांत काही युवकांना सोबत घेऊन, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीदेखील भेट घेतली होती. यावेळी येथील रुपचंद चौधरी, आकाश भालेराव, सुनिल पवार, अनिल पवार, दशरथ राठोड, नटवर जाधव, मनोज जाधव, किरण परदेशी, ज्ञानेश्वर राठोड, हेमंत राठोड यासह ५० ते ६० युवकांनी तासभर ठिय्या मांडला होता.काळे फासण्याचा इशारानियुक्ती संदर्भातील होत असलेल्या दिरंगाई बद्दल सी.पी. पाटील यांच्याकडून व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या शरद पाटील यांनी मुख्य कामगार आयुक्तांशी मोबाईल वरुन संपर्क साधला. दोन वर्षांपासून होत असलेल्या दिरंगाईबद्दल चांगलेच धारेवर धरले. तसेच आठवडाभरात युवकांच्या नियुक्ती संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा मुंबईला येऊन, चेहºयाला काळे फासू अशा इशाराही शरद पाटील यांनी मोबाईलवरुन दिला.माजी आमदारांकडून आंदोलनाचे नेतृत्त्वप्रशासनातर्फे कुठलेही समाधान कारक उत्तर मिळत नसल्याने, सोमवारी दुपारी विविध ठिकाणचे ५० ते ६० युवक गांधी उद्यानाजवळ एकत्र जमले होते. यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटीलदेखील या युवकांसोबत हजर होते.या ठिकाणाहूनच युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत, भास्कर मार्केटसमोरील माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयावर धडकले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करुन, येथील कामगार निरीक्षक सी.पी.पाटील यांना घेराव घालून, दोन वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्यांसदर्भात प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. यावेळी शरद पाटील यांनीदेखील पाटील यांना चांगलेच धारेवर धरले होते.

 

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव