विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून गटविकास अधिकाऱ्याची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 15:58 IST2020-12-03T15:56:36+5:302020-12-03T15:58:09+5:30
बोदवड पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराबाबत आमदारांनी केली होती तक्रार

विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून गटविकास अधिकाऱ्याची चौकशी
ब ोदवड: पंचायत समितीने भ्रष्टाचाराचा तालुक्यात कळस गाठला आहे. याची दखल घेत नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या पथकान थेट येथे येत चौकशी सुरु केली आहे. हे पथक गुरुवारी दिवसभर बोदवड पंचायत समितीत कागदपत्राची तपासणी करत होते,बोदवड तालुक्यातील पंचायत समिती मध्ये तत्कालीन व सध्या भडगाव येथे असलेले गट विकास अधिकारी आर. ओ .वाघ यांच्या कार्यकाळात तालुक्यात ५०० घरकुल रमाई घरकुल योजनेत मंजूर झाले होते,. परंतु सदर योजने अंतर्गत फक्त ३०० घरकुलाची गरज असल्याचे दाखवत २०० घरकुल प्रकरणे त्यांनी लाभार्थी असून सुद्धा परत पाठवले. तर परत पाचशे घरकुलांची मागणीही केली, त्याच प्रमाणे तालुक्यात चौदाव्या वित्त आयोचा निधी शिल्लक असताना देखील कोल्हाडी व बोरगाव येथील ग्रामनिधी शिल्लक नसल्याचे नमूद करत कामे केली नाही. तर चौदाव्या वित्त आयोगात कोल्हाडी ग्रापंत २६ लाख सत्तावीस हजार निधी शिल्लक आहे, तर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षण भिंतींबाबत कोल्हाडी, बोरगाव, सुरवाडे, मुक्तळ, चिखली, शेलवड, लोणवाडी या गावातील कामाच्या तक्रारी असून सुद्धा चौकशी केली नाही त्याच प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगचा निधी मान्यता नसताना खर्च केला असून त्याचीही कर्यावही केली नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील स्वच्छ भारत अभियानाच्या योजनेत भ्रष्टाचार त्याच प्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेचा निधी परस्पर वर्ग करणे या सारखे आरोप असून त्याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांकडे तर तालुक्यातील शेलवड येथील दीपक माळी, व मोतीराम भोई आदींनी आमदार तसेच जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच शेलवड येथील तत्कालीन सरपंच व आताचे सरपंच निलेश माळी यांनी गावातील सार्वजनिक भूखंड शासनाची परवानगी न घेता परस्पर विकल्याची तक्रार दिली होती, या सर्व प्रकणाच्या साठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या पथकाने गुरुवारी बोदवड पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ याना बोलवून बोदवड पंचायत समिती मध्ये चौकशी केली यात दिवस भर विविध प्रकरच्या फायली, कागदपत्रे घेऊन सदर पथक बसले होते, सदर पथकात धुळे जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी बी. एम. मोहन, धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी प्रकाश खोतकर , जळगाव जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, यांच्यासह चार अधीकारी व कर्मचारी होते. याप्रकरणी चौकशी अधिकारी प्रकाश खोतकर यांची प्रतिक्रिया घेतलीं असता विभागीय आयुक्तांच्या आदेशाने आम्ही चौकशीसाठी आलो असून चौकशी अहवाल आयुक्तांना देण्यात येईल. फोटो : क्रमांक०४ एचएस के 09 बोदवड पंचायत समित कागदपत्रे तपासत असताना चौकशी अधिकारी (छाया : गोपाल व्यास)