नाशिक विभागीय आयुक्त पथकाकडून पंचायत समितीची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:46+5:302020-12-04T04:46:46+5:30

बोदवड जि. जळगाव : पंचायत समितीमधील घरकूल आणि १४व्या वित्त आयोगातील निधीच्या गैरव्यवहारप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांचे एक गुरुवारी सकाळीच ...

Inquiry of Panchayat Samiti by Nashik Divisional Commissioner's Squad | नाशिक विभागीय आयुक्त पथकाकडून पंचायत समितीची चौकशी

नाशिक विभागीय आयुक्त पथकाकडून पंचायत समितीची चौकशी

बोदवड जि. जळगाव : पंचायत समितीमधील घरकूल आणि १४व्या वित्त आयोगातील निधीच्या

गैरव्यवहारप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांचे एक गुरुवारी सकाळीच पथक बोदवडमध्ये दाखल झाले आहे. याप्रकरणी अहवाल विभागीय आयुक्तांकडे देण्यात येणार असल्याचे या पथकातील सदस्यांनी सांगितले.

या योजनांमधील गैरव्यवहाराबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाली आहे. या पथकाने दिवसभर कागदपत्रांची तपासणी केली.

बोदवड पंचायत समितीमध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी आर. ओ .वाघ यांच्या कार्यकाळात तालुक्यात रमाई घरकुल योजनेत ५०० घरे

मंजूर झाली होती. परंतु या योजनेत फक्त ३०० घरकुलांची गरज असल्याचे दाखवत २०० प्रकरणे त्यांनी लाभार्थी असूनसुद्धा परत पाठविली. यानंतर पुन्हा पाचशे घरकुलांची मागणीचा प्रस्तावही पाठविला.

त्याचप्रमाणे तालुक्यात चौदाव्या वित्त आयोचा निधी शिल्लक असताना कोल्हाडी व बोरगाव येथील ग्रामनिधी शिल्लक नसल्याचे दाखविल्याचा आरोप आहे. या पथकात धुळे जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी बी. एम. मोहन, धुळे जि.प.चे डेप्युटी सीईओ प्रकाश खोतकर, जळगाव जि.प.चे डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांच्यासह चार अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाने आम्ही चौकशीसाठी आलो आहोत, यासंबंधीचा अहवाल आयुक्तांना देण्यात येईल, अशी माहिती चौकशी अधिकारी प्रकाश खोतकर यांनी दिली.

Web Title: Inquiry of Panchayat Samiti by Nashik Divisional Commissioner's Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.