भुसावळ बसस्थानकात आरोपीने केलेल्या गोळीबारात प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:34 IST2017-12-22T14:33:56+5:302017-12-22T14:34:01+5:30
मद्यपानासाठी सहका:याच्या दिशनेही झाडली गोळी

भुसावळ बसस्थानकात आरोपीने केलेल्या गोळीबारात प्रवासी जखमी
ठळक मुद्देआरोपी फरार
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 22- लुटीसह खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या अजय गिरधारी गोडाली याने त्याचाच सहकारी दीपक गोपाल कारकर याला मद्यपान करणयासाठी त्याच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर पुन्हा एक गोळी झाडल्याने सचिन लक्ष्मण सरोदे हा प्रवासी जखमी झाला. ही घटना भुसावळ बसस्थानकात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर आरोपीने जखमीला सोबत घेऊन वरणगावच्या दिशेने पोबारा केला. व टोलनाक्यावर सोडून दिले. या प्रकरणी अजय व किसन गणेश पटेरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.