आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - सिंधी कॉलनीतील पी.एम. नगरात मुलींची छेड काढणाºयांना हटकल्यावरून अमीत सुभाष भावनानी (३०, रा. सिंधी कॉलनी) या तरुणास चार ते पाच जणांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीमध्ये घडली. दरम्यान, या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील समाध मंदिराच्या मागे असलेल्या पी.एम. नगरात रात्री कृष्णा भाट याच्यासह चार ते पाच तरुण आले व ते मुलींची छेड काढत होते. त्या वेळी त्यांना हटकले म्हणून त्यांनी घरात घुसून अमीत भावनानी यास मारहाण केली. यात हा तरुण जखमी झाला. या प्रकाराने घरातील महिला व इतर सदस्य भयभीत झाले.या प्रकारानंतर जखमीसह अशोक मंधान, प्रकाश बालानी, निरज जेसवाणी आदींनी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली.सततच्या अशा घटनांमुळे सिंधी बांधवांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
जळगावात मुलींची छेड काढणाºयांना हटकल्यावरुन तरुणास घरात घुसून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:00 IST
दहशत
जळगावात मुलींची छेड काढणाºयांना हटकल्यावरुन तरुणास घरात घुसून मारहाण
ठळक मुद्दे सिंधी कॉलनीतील रात्री १०.३० वाजेची घटना घरातील महिला व इतर सदस्य भयभीत