चांदणी कुर्हेजवळ अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:04+5:302021-09-24T04:21:04+5:30

अमळनेर : तालुक्यातील चांदणी कुर्हे गावाजवळ १८ सप्टेंबर रोजी अपघात झालेल्या अनोळखी इसमाचा दुसऱ्या दिवशी धुळे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान ...

Injured died in an accident near Chandni Kurhe | चांदणी कुर्हेजवळ अपघातातील जखमीचा मृत्यू

चांदणी कुर्हेजवळ अपघातातील जखमीचा मृत्यू

अमळनेर : तालुक्यातील चांदणी कुर्हे गावाजवळ १८ सप्टेंबर रोजी अपघात झालेल्या अनोळखी इसमाचा दुसऱ्या दिवशी धुळे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अनोळखी इसम वय अंदाजे ४८ आहे. १८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चांदणी कुर्हे गावाजवळ वीज कंपनीच्या उपकेंद्राजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते,याची माहिती एकाने कुर्हे गावाचे पोलीस पाटील भरतसिंग पाटील यांना दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर १०८ एम्ब्युलन्सद्वारे जखमीस अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून तेथून धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. या इसमाचा १९ रोजी मृत्यू झाला असून, याबाबत अमळनेर पोलिसात पोलीस पाटील भरतसिंग पाटील यांच्या खबरीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.

Web Title: Injured died in an accident near Chandni Kurhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.