होळपिप्री येथे शेती वाटणीच्या कारणावरून डोक्यास मारल्याने जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:56+5:302021-07-22T04:12:56+5:30
तालुक्यातील पिंपरी येथे शेतीचा हिस्सा न दिल्याचा राग येऊन आरोपीने फिर्यादी कुटुंबास काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी ...

होळपिप्री येथे शेती वाटणीच्या कारणावरून डोक्यास मारल्याने जखमी
तालुक्यातील पिंपरी येथे शेतीचा हिस्सा न दिल्याचा राग येऊन आरोपीने फिर्यादी कुटुंबास काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. १६ रोजी घडली. याबाबत दि. २० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र रामभाऊ पाटील (होळपिंप्री) यांनी फिर्याद दिली की, होळपिंप्री, भोकरबारी येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. ती वाटणी मी माझ्या भावाकडे मागितली असता आरोपी दिनकर आत्माराम पाटील, आत्माराम रामभाऊ पाटील, अनिता दिनकर पाटील यांना राग आल्याने आरोपी हे नेहमी फिर्यादीशी वाद घालतात व फिर्यादीच्या शेतातील नुकसान करतात. याबाबत न्यायालय केस चालू आहे. याचा आरोपीस राग आल्याने त्यांनी मला व माझ्या कुटुंबास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीवरून आज पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे