शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

परराज्यातील मृत महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:15 IST

अपघातात जखमी झालेले असो किंवा गरीब कुटुंबातील आजाराने जर्जर सदस्य असो केवळ माहिती मिळाली की तत्काळ देव रूपाने समोर उभा राहतो तो म्हणजे शहरातील सागर बडगुजर.

ठळक मुद्देसेवाव्रत जोपासणाऱ्या सागर बडगुजरने दाखवले माणुसकीचे दर्शनसमाजातील दानशुरांनीही लावला हातभार

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : कोणत्याही प्रकारातून मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय अथवा हॉस्पिटलपर्यंत पोचविण्याचे काम असो अथवा अपघातात जखमी झालेले असो किंवा गरीब कुटुंबातील आजाराने जर्जर सदस्य असो केवळ माहिती मिळाली की तत्काळ देव रूपाने समोर उभा राहतो तो म्हणजे शहरातील सागर बडगुजर.चोपडा शहरात नव्हेतर तालुक्यात खºया अर्थाने सेवाव्रत जोपासणाºया सागर बडगुजर या व्यक्तीने माणुसकीचे दर्शन दाखवून येथील तापी सहकारी सूतगिरणीमध्ये सेवेत असलेल्या परराज्यातील अर्थात ओडिशातील मृत महिलेला उपचारासाठी दाखल करण्यापासून तर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढेपर्यंत सर्वतोपरी मदत करून माणुसकीचे व देव रूपाचे दर्शन दाखविले. हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा जोपासत असल्याने दानशूर व सक्षम लोकांकडून मदत घेऊन सेवेसाठी तत्पर असतो.तापी सहकारी सूतगिरणीमध्ये ओडिशा येथील ३५ वर्षीय कस्तुरा बुटिका नोकरी करत होती. अचानक तिची तब्येत गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी बिघडल्याने ती येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र काहीही आजार नसल्याचे सांगून परत पाठवले. त्याच वेळेस त्या महिलेच्या अंगात प्रचंड ताप होता. यातच सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांना या महिलेची तब्येत सूतगिरणी क्षेत्रातच बिघडल्याचे समजले. त्यांनी सामाजिक सेवा जोपासणारा व अँम्ब्यूलेन्स सेवा तत्काळ देणारा सागर बडगुजर या तरुणाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती कळवली. कस्तुरा बुटिका या महिलेस बडगुजर यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचे दुसºया-तिसºया दिवशी मृत्यू झाला. इकडे त्या महिलेचा भाऊबंदकी, समाज कोणीच नसल्याने अंतयात्रा कुठून काढायची हा प्रश्न तिच्या पतीच्या मनात निर्माण झाला. त्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन खोलीपासून तिची अंत्ययात्रा काढावी असे ठरले. यासाठी सागर बडगुजर याने दानशूर व्यक्तींकडून संपर्क करून अंत्ययात्रेसाठी लागणाºया साहित्याची अथवा अँब्यूलन्ससाठी लागणारे डिझेलसाठी उपलब्धी केली आणि त्यातच ही महिला ख्रिश्चन धर्मिय असल्याने तिने मृत्यूआधी माझे शरीर न जाळता मातीत पुरायचे, असे सांगितल्याने काहीवेळ अंत्ययात्रेला उशीर झाला.अखेर या महिलेचे शव स्मशानभूमीत नेऊन तिथे जाळावे असे ठरले. ही महिला ख्रिश्चन धर्मिय असल्याने कोळसन अण्णा नामक व्यक्तीने फादर आणून ख्रिश्चन धर्मीय विधिवत पद्धतीने तिची अंत्यविधी आटोपला. यासाठी सर्वतोपरी सागरने धडपड करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत वेले येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील आणि सामाजिक सेवा जोपासणाºया अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अंत्यविधीसाठी यथाशक्ती मदत देऊन हा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी सूतगिरणीमधील मनोहर पाटील, शंकर जैन, अक्षय महांती, रश्मी रंजनदास, राजेश्वर पाटील, सुनील सोनगिर,े अमर संस्थेचे एन.आर.पाटील, चतुर पाटील यांनीही या महिलेच्या अंत्यविधीसाठी मदत केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChopdaचोपडा