अभियंत्यांकडून घेतली माहिती, आज अहवाल मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:18+5:302021-08-13T04:21:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेल्या ३० व्हेंटिलेटरची अभियंत्यांनी तपासणी केल्यानंतर चौकशी समितीप्रमुख प्रशासन अधिकारी डॉ. ...

Information taken from the engineers, will be reported today | अभियंत्यांकडून घेतली माहिती, आज अहवाल मिळणार

अभियंत्यांकडून घेतली माहिती, आज अहवाल मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेल्या ३० व्हेंटिलेटरची अभियंत्यांनी तपासणी केल्यानंतर चौकशी समितीप्रमुख प्रशासन अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर यांनी ही सर्व माहिती संकलीत केली आहे. याबाबतचा एकत्रित अहवाल बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.

बुधवारीही व्हेंटिलेटरची तसेच जेईएम पोर्टलवरील प्रक्रियेची तपासणी करण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून ही चौकशी सुरू आहे. गुरूवारी याबाबत अहवाल येणार होता, मात्र, पोर्टलच्या तपासणीमुळे तो लांबणीवर पडला.

दडपण आणण्याचा प्रयत्न

आपण खरेदी प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबधित पुरवठादाराकडून नोटीस देऊन आपल्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती तक्रारदार दिनेश भोळे यांनी दिली आहे. दरम्यान, व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल येणार आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी भोळे यांना पत्र दिले आहे. कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा भोळे यांनी दिला होता.

Web Title: Information taken from the engineers, will be reported today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.