लाभार्थ्यांच्या घरी जाऊन घेतली नळजोडणीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST2020-12-23T04:13:47+5:302020-12-23T04:13:47+5:30
पाणी स्वच्छता मिशनच्या संचालिका दौऱ्यावर : जिल्हा परिषदेत बैठकीत सूचना जळगाव : राज्य पाणी व स्वच्छता अभियानच्या संचालिका ...

लाभार्थ्यांच्या घरी जाऊन घेतली नळजोडणीची माहिती
पाणी स्वच्छता मिशनच्या संचालिका दौऱ्यावर : जिल्हा परिषदेत बैठकीत सूचना
जळगाव : राज्य पाणी व स्वच्छता अभियानच्या संचालिका आर. विमला यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसह धरणगाव तालुक्यातील बोरखेडा ग्रामपंचायतीला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी काही ग्रामस्थांकडे जाऊन नळजोडणीची प्रत्यक्षात माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. यासह जिल्हा परिषदेत आढावा बैठकही घेण्यात आली.
बैठकीला राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक राहुल साकोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दिगंबर लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तत्काळ अंदाजपत्रक तयार करून या वर्षाचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करावे, याबाबत आर. विमला यांनी या बैठकीत सूचना केल्या. समन्वय ठेवून काम करावे, कोणतीही सबब ऐकली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी खडसावले. नळजोडणींचा ऑनलाइन आढावाही आर. विमला यांनी घेतला. बोरखेडा येथे माहिती घेताना गटविकास अधिकारी एस. आर. धनगर, ग्रामसेविका रोहिणी महाले, सरपंच रत्ना सोनवणे आदी उपस्थित होते.