शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्या - कृषिमंत्री दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:47 IST

दळवेल येथे शिवार पाहणी

पारोळा, जि. जळगाव : शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे म्हणून कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरीदेखील अनुभवाच्या आधारे पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन घेतात. इतर शेतकºयांना याचा लाभ देण्यासाठी अशा यशस्वी पीक पद्धतींची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.पारोळा तालुक्यातील दळवेल येथे शिवार पाहणीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अमळनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर आदी उपस्थित होते.भुसे यांनी भगवान पाटील आणि परमेश्वर पाटील यांच्या शेताची पाहणी केली. शेतातील मक्याच्या उत्पादनाचा अभ्यास करून इतरही शेतकºयांना असे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. शेतकºयांच्या समस्या जाणून घेताना ते म्हणाले, शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात ही रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २ लाखापेक्षा अधिक कर्ज असलेले आणि नियमित कर्ज फेडणाºया शेतकºयांना दिलासा देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या बैठकाही घेण्यात आल्या असून लवकरच मंत्री मंडळाला अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतरस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात येईल आणि कृषी विभागातील पदे लवकरच भरण्यात येतील, असेही भुसे म्हणाले.कृषिमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत रोटोव्हेटर आणि अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. हरी गवळी आणि मनीषा गिरासे यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत बंदिस्त शेळी पालनासाठी ११ शेळींचे युनिट देण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव