आरक्षित डब्यामध्ये पालाविक्री करणाऱ्या महिलांची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:32+5:302021-09-15T04:20:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून जनरल तिकीट बंद ठेवण्यात आले असून, ...

Infiltration of women selling palanquins in reserved bins | आरक्षित डब्यामध्ये पालाविक्री करणाऱ्या महिलांची घुसखोरी

आरक्षित डब्यामध्ये पालाविक्री करणाऱ्या महिलांची घुसखोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून जनरल तिकीट बंद ठेवण्यात आले असून, आरक्षण असल्यावरच स्टेशनवर प्रवेश देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रत्येक डब्यांमध्ये प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमधील आरक्षित डब्यांमध्येच सोशल डिस्टन्सिंग पूर्णतः फज्जा उडालेला दिसून आला. रेल्वेने घालून दिलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन होत नसून, रेल्वे पोलीस आणि स्टेशनवरील अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसत असतानाही, त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्याचे आदेश त्या-त्या स्टेशनवरील तिकीट प्रबंधक यांना देण्यात आले आहे. मात्र, ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत जळगाव रेल्वे स्टेशनवर तिकीट वेटिंगवर आलेले प्रवासीदेखील जाताना दिसून आले. स्टेशनवरील दादऱ्यावर उभे असलेले तिकीट निरीक्षक आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना आत मध्ये सोडण्याचा प्रयत्न करत असले तरी अनेक प्रवासी नानाविध कारणे सांगून आत मध्ये जाताना दिसून आले, तर काही प्रवासी दुसऱ्या दादऱ्यावरून व तहसील कार्यालयाच्या पाठीमागून जाताना दिसून आले.

इन्फो

पाला विक्री करणाऱ्या महिलांमुळे अधिकच गर्दी

‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस व मुंबई हावडा एक्स्प्रेसमधून जळगाव रेल्वे स्टेशनवरून निंबाचा पाला घेऊन मुंबईला विक्रीला घेऊन जात असते. जळगाव स्टेशनवर जुना माल धक्क्याकडून या महिला निंबाच्या पाल्याचे ओझे घेऊन स्टेशनवर छुप्या मार्गाने शिरत असतात. एका महिलेकडे पाच ते सहा ओझे राहत असून, मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत मागील आरक्षित डब्यांमध्ये हे ओझे टाकून, मुंबईला विक्रीला घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे कुठलेही तिकीट नसताना, या महिला आरक्षित डब्यात प्रवास करत जात असतानाही स्टेशनवरील बंदोबस्तासाठी असलेले रेल्वे पोलीस व गाडीतील तिकीट निरीक्षकांकडूनही कोणतीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे रात्रीच्या मुंबई हावडा एक्स्प्रेसमध्ये दररोज पाला घेऊन जाणाऱ्या महिलांच्या गर्दीमुळे स्थानिक प्रवाशांना गाडीत शिरण्यासाठीही जागा राहत नसल्याचे दिसून आले.

इन्फो :

कारवाईबाबत रेल्वे पोलीस व तिकीट निरीक्षकांचे एकमेकांकडे बोट

‘लोकमत’ प्रतिनिधीने विना तिकीट आणि तेही आरक्षित डब्यांमधून पाल्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईबाबत एका तिकीट निरीक्षकाला विचारले असता, त्यांनी कारवाईचे अधिकार रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना असल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांसमोरच या महिला गाडीत पाल्याचे ओझे टाकत असतात. त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा कारवाईदेखील केल्याचे त्यांनी सांगितले. तर एका रेल्वे पोलिसाने पालेवाल्या महिलांवर आमची कारवाई सुरूच असते. मात्र, आरक्षित डब्यातून या महिला आपले ओझे विना तिकीट नेत असतात, हे गाडीतील तिकीट निरीक्षकांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Infiltration of women selling palanquins in reserved bins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.