दापोरा येथे स्वच्छतेअभावी डासांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:06+5:302021-09-03T04:18:06+5:30
दापोरा ता. जळगाव : येथे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असून, स्वच्छतेअभावी डासांचा उपद्रव वाढला आहे. ...

दापोरा येथे स्वच्छतेअभावी डासांचा उपद्रव
दापोरा ता. जळगाव : येथे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असून, स्वच्छतेअभावी डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
दापोरा गाव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद यांचे अंतर्गत येत असल्याने तेथील एकही कर्मचारी गावात येत नसल्याची परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ कोरोनाच्या संकटामुळे त्रस्त झाले आहेत आणि त्यात आता सततच्या पावसामुळे अनेक गावात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान मुलांसह अनेक लोक थंडी, तापसारख्या आजाराने फणफणत आहेत, असे असतानादेखील आरोग्य विभागाकडून कोणतीही जनजागृती केली जात नाही. घरापरत आरोग्याची तपासणी व्हावी, अशी मागणी होत आहे.
म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दापोऱ्याचा समावेश
दापोरा गावाचा समावेश म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात समावेश आहे त्या अंतर्गत आरोग्य सेवकाची नेमणूक असून, एकही दिवस दापोरा येथे येत असून, यामुळे गावात अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
गणपती मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य
दापोरा येथील प्रभाग एक मधील गणपती मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरवस्तीत उकिरडे तसेच गावाचे सांडपाणी घराच्या आजूबाजूने पसरलेले आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेकडे राजू चव्हाण यांनी लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे
फोटो कॅप्शन
दापोरा येथील प्रभाग एक मधील घरासमोर जात असलेली सांडपाण्याचे गटार व वाढलेले गवत.