करमाड येथे डेंग्यूसदृश्य आजाराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 20:44 IST2019-09-29T20:44:36+5:302019-09-29T20:44:41+5:30
नेरी, ता.जामनेर : येथून जवळ असलेल्या करमाड येथे चौदावर्षीय निलेश कैलास पाटील या मुलाला डेंगू सदृश्य आजाराची लागण झाल्याने ...

करमाड येथे डेंग्यूसदृश्य आजाराची लागण
नेरी, ता.जामनेर : येथून जवळ असलेल्या करमाड येथे चौदावर्षीय निलेश कैलास पाटील या मुलाला डेंगू सदृश्य आजाराची लागण झाल्याने त्याला जळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर औषधोपचार करुन आजार नियंत्रणात आल्यानंतर त्याला घरी रवाना केले.
गेल्या आठवड्यात आजारी असलेल्या नीलेशवर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा दिसत नसल्याने त्याला जळगावला हलवण्यात आले होते. रक्ताची चाचणी केल्यावर डेंग्यूूची सुरवात असल्याचे निदान झाले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले असून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत दखल घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.