सात्रीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:19+5:302021-09-07T04:20:19+5:30

महाजन, रवींद्र भारदे, सीमा अहिरे या प्रमुख अधिकाऱ्यांसह तापी खोरे महामंडळाचे अधिकारी, सर्कल, तलाठी आदी मंडळी उपस्थित होती. ...

Indications that Satri's rehabilitation work is gaining momentum | सात्रीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळण्याचे संकेत

सात्रीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळण्याचे संकेत

महाजन, रवींद्र भारदे, सीमा अहिरे या प्रमुख अधिकाऱ्यांसह तापी खोरे महामंडळाचे अधिकारी, सर्कल, तलाठी आदी मंडळी उपस्थित होती. गावाच्या पुनर्वसनाचे काम का रेंगाळले, विलंब का, अडीअडचणी नेमक्या काय आहेत या कारणाचा शोध ही मंडळी घेत असून तसा अहवाल ते विभागीय आयुक्तांना पाठविणार आहेत. नव्या गावात मूलभूत सुविधांमध्ये कॉंक्रिट उघड्या गटारी की भूमिगत गटारी पाहिजेत याबाबतही अभिप्राय त्यांना कळवावा लागणार आहे. तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन यावेळी सर्व्हेही करण्यात आला.

सात्री या जुन्या गावातील गावठाणाचे संपादन अजून बाकी आहे. संपादनच झालेले नसल्यामुळे कोण बाधित, विस्थापित होणार अशा कुटुंबांची नावे व निश्चित संख्याच माहिती नाही. त्यामुळे नव्या गावात प्लॉट मिळू शकत नाहीत. या प्रक्रियेला संयुक्त मोजणीच्या कामातील किरकोळ दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. गेल्या १४ महिन्यांपासून भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी ही दुरुस्ती करून दिली नसल्याने विलंब होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी अहिरे यांना एका आठवड्याच्या आत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

सात्री येथील प्रकल्प बाधितांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. भूसंपादन अधिकारी सीमा अहिरे यांना गृह संपादनाचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा. तसेच मूल्यांकन तत्काळ मागवून निवाडा घोषित करण्यासंदर्भात सूचना दिल्याचे समजते. स्लॅब रजिस्टर तयार करण्यासंदर्भात प्रक्रिया तातडीने व्हावी. गृृह संपादनाच्या प्रस्तावाला गती मिळावी. पुनर्वसित गावठाणातील बंद असलेली कामे सुरू करण्यात यावीत, अशी भूमिका सरपंच महेंद्र बोरसे यांनी यावेळी लावून धरली.

यावेळी सरपंच महेंद्र बोरसे, सुनील बोरसे, छबीलाल भिल, खंडेराव मोरे, श्रीराम बागुल, महेंद्र मोरे, जगन भिल, एकनाथ भिल, मनोहर बोरसे, राजेंद्र ठाकरे, गुमान भिल, रामलाल भिल, ग्रामसेवक श्यामकांत धनगर, तलाठी वाल्मीक पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Indications that Satri's rehabilitation work is gaining momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.