भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने केला १५ शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:10+5:302021-09-14T04:19:10+5:30
तालुक्यातील प्रा. सागर धनगर, अजय सैंदाणे, प्रा. वाय. डी. पाटील, जीवन पाटील, प्रा. अनिता लांडगे, दिवाकर नाथ, अनिल चैत्राम ...

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने केला १५ शिक्षकांचा सन्मान
तालुक्यातील प्रा. सागर धनगर, अजय सैंदाणे, प्रा. वाय. डी. पाटील, जीवन पाटील, प्रा. अनिता लांडगे, दिवाकर नाथ, अनिल चैत्राम पाटील, आशा वाघजाळे, नरगिस पटेल, चंद्रशेखर साळुंखे, प्रतिभा सोनवणे, प्रा. दिव्यांक सावंत, खुमानसिंग बारेला, श्रीराम पाटील, प्रा. भरत महाजन आदी शिक्षकवृंदांना फेटे बांधून व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. शहरातील नारायणवाडी परिसरातील नवे विठ्ठल मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे होते.
याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले, व्याख्याते प्रा.संदीप बी. पाटील, विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. प्रकाश एस. लोहार, संजय गांधी निराधार समितीच्या सदस्या मंगला पाटील, कवयित्री तथा गझलकार योगिता पाटील, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. राहुल वाकलकर आदी प्रमुख मान्यवरांसह जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष दिव्या भोसले, अविनाश जावळे, सचिव आकाश पाटील, आकाश धनगर, कोमल पाटील, समन्वयक नयनकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी पंकज बोरोले, प्रा. संदीप बी.पाटील, डाॅ.प्रकाश एस.लोहार, कवयित्री तथा गझलकार योगिता पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,
कार्यक्रमासाठी रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी युवा परिषदेचे जिल्हा समन्वयक मयूर पाटील, अश्विनी पाटील यांच्यासह चोपडा तालुका पदाधिकारी शैलेश धनगर, दीपक भालेराव, रोहिणी पाटील, सनी पाटील, वैष्णवी सोनवणे, प्रवीण पाटील, कामिल तडवी, जयेश सनेर, परेश पवार, प्रवीण साळुंखे, तन्मय अहिरराव, विनोद सोये, नीलेश भिल्ल, दीपिका निकम, कुलभूषण दोडे, कुणाल सोनवणे, किरण चौधरी, नम्रता अग्रवाल, समाधान कोळी, निखिल पाटील, प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सचिव कुणाल सोनवणे यांनी तर तालुका उपाध्यक्ष दीपक भालेराव आभार मानले.
130921\img-20210913-wa0018.jpg
सत्करार्थी शिक्षक