कासोद्यात साजरा झाला स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:14+5:302021-08-17T04:23:14+5:30

कासोदा : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिवस विविध संस्थांमार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच महेश पांडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत ...

Independence Day was celebrated in Kasoda | कासोद्यात साजरा झाला स्वातंत्र्य दिन

कासोद्यात साजरा झाला स्वातंत्र्य दिन

कासोदा : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिवस विविध संस्थांमार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच महेश पांडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

साधना विद्यालय

साधना विद्यालयात भारतीय सैन्यातील जितेंद्र व सचिन अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जी. के. सावंत, एस. एम. पाटील, व्ही. डी. पाटील, प्रकाश पाटील, प्रवीण जाधव उपस्थित होते.

आश्रमशाळा

प्राथमिक आश्रमशाळेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका शोभा माधवराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुरेखा पाटील, उत्तम सूर्यवंशी, नाना भुरे, वैशाली सोनवणे, दीपक भडांगे, धनंजय सैंदाणे, सुवर्णा सोनवणे, मनीषा पाटील, गजानन महाजन, कैलास मराठे, धर्मेंद्र सपकाळे, राजेंद्र पाटील, ज्योत्स्ना सोनवणे, आदी उपस्थित होते.

Web Title: Independence Day was celebrated in Kasoda