शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोष साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:31+5:302021-08-20T04:21:31+5:30
जळगाव : शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांमध्ये नृत्य, चित्रकला, वक्तृत्व तसेच चित्रकला आणि गायन स्पर्धा घेऊन स्वातंत्र्य दिन ...

शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोष साजरा
जळगाव : शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांमध्ये नृत्य, चित्रकला, वक्तृत्व तसेच चित्रकला आणि गायन स्पर्धा घेऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांची, संतांची तसेच भारत मातेची वेशभूषा साकारली होती.
संस्कृती माध्यमिक विद्यालय
मेहरुण येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्ञानेश्वर नाईक, अनिल पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्विनी फालक यांनी केले. आभार ईश्वर पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका डिंपल येवले, ज्योती सोनवणे, सुहास कोल्हे, मनीषा जाधव, माधुरी बिजलपुरे, विवेकानंद तायडे, कविता पाटील, वसंत महाजन आदींनी परिश्रम घेतले.
कानळदा विद्यालय
कानळदा येथील ग्रा.शि. संस्था संचलित आदर्श विद्यालयात के.एम. विसावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य के.पी. चव्हाण यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गुलाबराव देवकर, रोहणी खडसे, ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय शपथविधी घेऊन देशाच्या एकात्मकतेसाठी व उच्च धैर्यासाठी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विलास पाटील, वाल्मीक पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, योगेश देसले, रवींद्र पाटील, किरण राजपूत, अभिषेक पाटील, नामदेव पाटील, संजय पवार, राजेश पाटील, अश्विनी देशमुख, कल्पिता पाटील, मजहर पठाण, कुणाल पवार, सलीम इनामदार, सचिन पाटील, अशोक पाटील, जयश्री पाटील आदींची उपस्थिती होती.
जय दुर्गा माध्यमिक विद्यालय
जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लबचे अध्यक्ष वीरेंद्र छाजेड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रणव मेहता, संग्रामसिंह सूर्यवंशी, अनिल पाटील, ज्ञानेश्वर नाईक, ज्योती पाटील, सागर कोल्हे आदींची उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणसुध्दा करण्यात आले. सूत्रसंचालन नीलेश पाटील यांनी केले. तर आभार शरद पाटील यांनी मानले. तसेच वक्तृत्व, गायन, निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.