पगाराची थकीत रक्कम न मिळाल्यास १६ जूनपासून बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:17+5:302021-06-16T04:23:17+5:30
यावल : तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा सुमारे चार महिन्यांपासून पगार थकीत आहे. याचबरोबर ...

पगाराची थकीत रक्कम न मिळाल्यास १६ जूनपासून बेमुदत उपोषण
यावल : तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा सुमारे चार महिन्यांपासून पगार थकीत आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी
भरला जात नसल्याने या कर्मचाऱ्यांनी १६ जूनपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रत येथील गटविकास अधिकारी यांनाही दिली आहे.
तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये १५ कर्मचारी काम करीत असून, त्यात क्लार्क, शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार पगार मागूनही मिळत नसून भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरली जात नाही. फेब्रुवारी महिन्यात गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार शासकीय अनुदान मिळताच पगाराची संपूर्ण रक्कम देण्याचे कबूल केले होते. १६ जूनपर्यंत थकीत पगारासह भविष्य निर्वाह
निधीची रक्कम न भरल्यास कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनावर प्रदीप जोशी, छगन साळुंखे, जगदीश कंडारे, नाना पाटील, संदीप रोहिदास पाटील, सुरेश साळुंके, संदीप राजू पाटील, गौतम कंडारे, भिका जुम्मा रल, राजू मंगल जावा, शांताबाई कंडारे, बेबाबाई कंडारे, ज्योती राजू जावा, आरती कंडारे, रंजिता रल यांच्या सह्या आहेत.