जामठावरील स्टेनचा अविश्वसनीय मारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:21+5:302021-09-02T04:36:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने मंगळवारी जाहीर केलेल्या निवृत्तीनंतर त्याच्या नागपूरमधील ...

जामठावरील स्टेनचा अविश्वसनीय मारा!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर
: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने मंगळवारी जाहीर
केलेल्या निवृत्तीनंतर त्याच्या नागपूरमधील सर्वोत्तम गोलंदाजीच्या
आठवणींना उजाळा मिळाला. गोलंदाजांसाठी काहीच नसलेल्या खेळपट्टीवर स्टेनने
भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. त्यामुळे खेळपट्टी बनवलेल्या क्युरेटरनाही
स्टेनच्या गोलंदाजीचा धक्का बसला. त्याच्या या संस्मरणीय गोलंदाजीविषयी
क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
फेब्रुवारी २०१० मध्ये विदर्भ क्रिकेट संघटनेच्या (व्हीसीए) जामठा मैदानावर झालेला भारत वि. दक्षिण आफ्रिका कसोटी सामना स्टेनने गाजवला. आफ्रिकेने एक डाव आणि ६ धावांनी मिळवलेल्या विजयात स्टेन निर्णायक ठरलेला. यावेळी स्टेनने ५१
धावांत ७ बळी घेऊन केलेला मारा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम माऱ्यापैकी एक
ठरला.
व्हीसीएचे क्युरेटर हिंगणीकर यांनी स्टेनची गोलंदाजी अविश्वसनीय
असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, ‘खरं म्हणजे तेव्हा त्या खेळपट्टीमध्ये
गोलंदाजांसाठी आणि विशेष करून वेगवान गोलंदाजांसाठी काहीच नव्हते. पण
स्टेनने लेट स्विंगचा अप्रतिम मारा करत भारतीय डाव गुंडाळला होता. मी
आतापर्यंत पाहिलेला तो अविश्वसनीय मारा होता.’
जिथे भारतीयांना १७६ षटकांत केवळ सहा बळी मिळवता आले, तिथे एकट्या स्टेनने ७ बळी घेत दबदबा राखला. हाशिम आमला (नाबाद २५३) व जॅक कॅलिस (१७३) यांच्या जोरावर द. आफ्रिकेने ६ बाद ५५८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर सामना अनिर्णीत राहण्याची चिन्हे होती. पण तो स्टेन होता, ज्याने तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग व महेंद्रसिंग धोनी अशा
दिग्गजांचा समावेश असलेल्या भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला.